ठाणेकरांनो… बुधवारी ‘या’ भागात राहणार पाणीपुरवठा बंद!

199

सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आलेला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झालेला आहे. हा गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने पंपाद्वारे होणारा पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे. हा गाळ काढण्यासाठी बुधवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

या भागात राहणार पाणी बंद

बुधवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच इंदिरानगर संप कडे जाणाऱ्या १९६८ मुख्य गुरुत्वजलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी इंदिरानगर संप वरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर इ. भागात पाणी पुरवठा २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पुर्णपणे बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – RSS नेत्याची दुकानात घुसून केली हत्या, पोलिसांकडून PFI नेत्याला अटक)

वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.