बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन त्याठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार (वॉटर गेट) बसविण्याचे काम बुधवारी १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी एकूण २४ तासांसाठी या जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Water Cut)
या जलवाहिनी बदलण्याच्या कामाच्या कालावधीत दक्षिण मुंबईतील विशेषत: ए, बी आणि ई विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका जलअभियंता विभागाने दिली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. त्यामुळे १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केला. (Water Cut)
कुलाबा ए विभाग-
नेव्हल डॉकयार्ड सप्लाय – सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ४.१५ आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री १.००) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
भायखळा ई विभाग–
नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ६.३०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
म्हातारपाखाडी रोड झोन – म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी ८.१५) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
डॉकयार्ड रोड झोन – बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.२० ते दुपारी २.५०) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
हातीबाग मार्ग – हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
जे. जे. रुग्णालय – (२४ तास पाणीपुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. (Water Cut)
मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन – मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४५ ते सायंकाळी ५.५५) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
रे रोड झोन – बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.१५) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
माऊंट मार्ग – रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : ताडोबाच्या जंगलात मुक्त करणार ७ जटायू पक्षी)
मस्जिद बंदर बी विभाग–
बाबूला टँक झोन – मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
डोंगरी बी – झोन – नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
डोंगरी ‘ए’ झोन – उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.३० ते रात्री १०.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन – सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० आणि रात्री ११.३० ते मध्यरात्री २.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
मध्म रेल्वे – रेल्वे यार्ड (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
वाडी बंदर – पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.२० ते सायंकाळी ५.३०) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
वाडी बंदर – पी. डिमेलो मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
आझाद मैदान बुस्टींग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community