महानगरपालिकेच्यावतीने पवई निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या दुरुस्तीसाठी पावसाळा वगळता १३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कप्पा क्रमांक १ ची दुरुस्ती ही सोमवारी ६ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे, कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Water Cutting In Mumbai)
जलाशयाच्या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जलअभियंता विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. (Water Cutting In Mumbai)
(हेही वाचा – Assembly Elections : ‘या’ नेत्यांचे राजकीय भविष्य विजयावर अवलंबून)
कुर्ला पश्चिम परिसरातील ‘या’ प्रभागांमध्ये कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
अंधेरी पूर्वः बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत) (Water Cutting In Mumbai)
घाटकोपर अंधेरी लिंक रोडः टिळक नगर, बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत) (Water Cutting In Mumbai)
कुर्ला-अंधेरी रस्ताः जरी मरी, विजय नगर, एल. बी. एस. नगर, शास्त्री नगर, शेट्टीया नगर, सत्य नगर जलवाहिनी, वायर गल्ली, ३ नंबर खाडी (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत) (Water Cutting In Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community