- विशेष प्रतिनिधी, मुंबई
नागपाडा पहिली कामाठीपुरा येथील सिद्धार्थ नगरमधील पाण्याची टाकी पडून फुटल्याने यामध्ये चार जण जखमी झाले असून, त्यातील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तीन जणांवर नजिकच्या फौजिया रुग्णालयात उपचार सुरु आहे. आश्रय योजनेअंतर्गत येथील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास सुरु आहे. या प्रकल्पाचे काम सुरु असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदाराचे हे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली असून यात कंत्राटदार कामगाराचे कुटुंब अडकले गेले. (Water Tank Collapse)
(हेही वाचा – Vulture Migration : ताडोबातील गिधाड ४००० किमीचे अंतर पार करत पोहोचले तामिळनाडूत)
नागपाडा येथील सिद्धार्थ नगरमधील सफाई कामगारांच्या वसाहतीचा आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास महापालिकेच्यावतीने केला जात आहे. या सफाई वसाहतीतील इमारत रिक्त करण्यात आली असून या ठिकाणी नियुक्त केलेल्या कंत्राटदार कंपनीमार्फत काम सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी प्रकल्पाकरता असलेली पाण्याची टाकी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडून फुटण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये खुशी खातून या ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. येथील फौजिया खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केले. तर गुलाम रसूल (३२), मिराज खातून (०९), नजरानबीबी (३३) या तिघांवरही फौजिया रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी कळवले आहे. (Water Tank Collapse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community