दादर रेल्वे स्थानकात पाण्याचा अपव्यय!

मध्य रेल्वे अनेक स्थानकांवर नव्या वॉटर वेडिंग मशिन्स बसवण्यासाठी योजना आखत आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे, नव्या वॉटर वेडिंग मशिन्स प्रकल्पाचे नियोजन करताना रेल्वे प्रशासनाचे जुन्या पाणपोईंकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील पाणपोईच्या नळातून दुरुस्तीअभावी गेले काही दिवस पाणी वाहत आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्वीट करण्यात आला आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील पाणपोईचा नळ गेले काही दिवस असाच वाहत आहे याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रशासन आपली ‘पाणी वाचवा’ मोहीम येथे राबवेल का? असा सवाल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कमी होणारी पाण्याची पातळी आणि जलस्त्रोतांमधील घटता पाणीसाठा पाहता रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

हजारो लिटर पाणी वाया

प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध स्थानकांवर वॉटर वेडिंग मशिन्स बसवण्यात येत आहेत.  मात्र जुन्या पाणपोईकडे रेल्वेने लक्ष देऊन या नळाची दुरुस्ती केल्यास पाण्याचा अपव्यय निश्चितच टाळता येईल. या वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याची बचत झाल्यास प्रवाशांना बाटलीबंद पाण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. तसेच दादर हे रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक असल्याने महत्त्वाच्या स्टेशनवर जर अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होत असेल तर रेल्वेच्या इतर स्थानकांमध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here