मुंबईकरांना झटपट अलिबागला पोहोचता यावे यासाठी १ नोव्हेंबरपासून मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि मांडवादरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी अखेर ही सेवा बंद करण्याची नामुष्की नयनतारा शिपिंग कंपनीवर ओढवली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून कंपनीने सोमवार ते शुक्रवार ही सेवा बंद केली असून यापुढे केवळ शनिवार आणि रविवार ही सेवा बेलापूर ते मांडवा मार्गे मुंबई ही सेवा सुरू राहणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट खाजगीकरणाच्या वाटेवर अन् प्रवाशांची होतेय गैरसोय!)
१ नोव्हेंबरपासून मुंबई ते मांडवा अशी थेट वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. ही देशातील पहिली वॉटर टॅक्सी नयनतारा शिपिंग कंपनीने सुरू केली होती. या वॉटर टॅक्सीने मुंबई ते अलिबाग हा प्रवास केवळ ४० मिनिटांमध्ये करणे शक्य होते. या वॉटर टॅक्सीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही परिणामी ही सेवा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई ते बेलापूर नवी सेवा लवकरच
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ही नवी वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस ही, सेवा सुरू राहिल. बेलापूर ते मांडवा व्हाया मुंबई आणि मांडवा ते बेलापूर व्हाया मुंबई ही सेवा फक्त आता शनिवार आणि रविवार असे दोन दिवसचं सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. ४०० ते ४५० वरून तिकीट दर २५० ते ३५० रुपयांपर्यंत आणले गेले तरीही प्रवासी संख्येत वाढ झाली नाही.
Join Our WhatsApp Community