Ujani Dam वर दीड वर्षांत सुरु होईल जलपर्यटन

82
Ujani Dam वर दीड वर्षांत सुरु होईल जलपर्यटन

उजनीच्या बॅक वॉटरवरील उजनी, शिराळ व सुर्ली यापैकी एका गावाच्या हद्दीत १९० कोटी १९ लाखांचा खर्च करून जलपर्यटन सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने धरणाची खोली, पर्यटनाची नेमकी जागा, याचा पहिला सर्व्हे आता पूर्ण केला आहे. आता धरणाच्या भिंतीपासून दोन किमी अंतरावरील ठिकाण, तेथील पाण्याची खोली (प्रत्येक महिन्यातील) व उपलब्ध शासकीय जागा-जमिनीची माहिती पाटबंधारे विभागाकडून घेतली जाईल. त्याचा नकाशा मिळाल्यानंतर महामंडळाकडून अंतिम पाहणी होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात केली जाणार आहे. (Ujani Dam)

(हेही वाचा – Bangladesh मध्ये तलवारीचा धाक दाखवत हिंदूंच्या धर्मांतराचे प्रयत्न)

दरवर्षी रशियाच्या सैबेरिया भागातून, हिमालय, पूर्व युरोप, आफ्रिका येथून पक्षी धरणावर येतात. सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यात पसरलेल्या उजनीचे पाणी १४५ किलोमीटरपर्यंत पसरले आहे. धरणाजवळून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग गेला असून धरणावरील जलपर्यटनासाठी ही जमेची बाजू आहे. याशिवाय दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा रेल्वे मार्गही कुर्डुवाडी-भीगवण या पट्ट्यातूनच गेला आहे. (Ujani Dam)

(हेही वाचा – Kurla Best Bus Accident : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तानंतर तात्काळ कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा सुरू)

पंढरपूरचा पांडुरंग, रुक्मिणी माता, तुळजापूरची आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक सोलापुरात येतात. त्यांच्यासाठी उजनीवरील जलपर्यटन आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. धरण परिसरात अनेक जुनी मंदिरे, राजवाडे आहेत. बॅक वॉटरला केळीचे क्षेत्र मोठे आहे. विविध प्रकारचे मासेही आहेत. साधारणतः २०२६च्या दिवाळीपूर्वी पर्यटन सुरू होईल, यादृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नियोजन सुरू आहे. (Ujani Dam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.