मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात शुक्रवारपासून 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता सागरी प्रवास 90 रुपयांवरुन 105 रुपये इतका झाला आहे.
प्रवाशांची संख्या मोठी
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात मोठी वाढ केली जाते. मागच्या वर्षीही 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यावर्षीही जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 90 वरुन थेट 105 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. लहान मुलांच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली आहे. लहान मुलांच्या तिकीटाचे दर 53 रुपये करण्यात आले आहेत. मोरा-भाऊचा धक्का हा सागरी मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत फायदेशीर, सुखद आणि शाॅर्टकट म्हणून ओळखला जातो. वाहतूक कोंडीची दगदग नसल्याने, या सागरी मार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
( हेही वाचा :एसटी बस २० फूट दरीत कोसळली, १५ गंभीर जखमी प्रवाशांवर उपचार सुरू )
दरवर्षी दरवाढ
मोरा- भाऊचा धक्का या मार्गावरील तिकीट दरात दरवर्षीच वाढ केली जाते, मात्र त्यानंतर तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते. यामुळे प्रवाशांचा एका प्रकारे लुटत केली जात आहे.
Join Our WhatsApp Community