भांडुप संकुलात तुंबले पाणी, मुंबईकरांच्या गेले नळाचे पाणी

83

मुंबईला पाणी शुद्ध करुन पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, मुंबईत रविवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. पाणी साचल्याने येथील पम्प बंद पडले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचा निचरा केल्याशिवाय पंप दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याने, संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा बंद रविवारी राहणार आहे.

पंपिंग स्टेशनमध्ये शिरले पाणी

मुंबईला ज्या धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करुन पुढे मुंबईकरांना पुरवठा केले जाते. मुंबईला दरदिवशी ३८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर पण्याचा पुरवठा केला जातो. पण रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची भांडुप संकुल परिसरात अधिक नोंद झाली. त्यामुळे हे संकुल पाण्याखाली गेले असून, पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. हे पाणी उपसण्याचे काम सध्या सुरू आहे.

…तर होणार उशिरा पाणीपुरवठा

महापलिका जल अभियंता व उपायुक्त (अभियांत्रिकी विभाग) अजय राठोर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या भागात पाणी साचल्याने तसेच पंपिंग स्टेशन विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे सांगितले. सध्या पाणी उपसण्याचे काम सुरू आहे, ते झाल्यानंतर पंप सुरू केले जातील. जर हे काम लवकर झाल्यास उशिरा मुंबईला पाणीपुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.