Wayanad Landslide : वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत मृतांचा आकडा ९३ वर, तर १२८ जखमी!

127
Wayanad Landslide : वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत मृतांचा आकडा ९३ वर, तर १२८ जखमी!
Wayanad Landslide : वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत मृतांचा आकडा ९३ वर, तर १२८ जखमी!

केरळमधील वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण भूस्खलनात (Wayanad Landslide) मृतांची संख्या वाढत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ९३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे १२८ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढेच नाही तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र, मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बचावकार्य करण्यास अडथळे येत आहे.

आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी
बचावकार्यासाठी हवाईदलाचे Mi-17 आणि ALH हे दोन हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने उभ्या केलेल्या कंट्रोल युनिटच्या मदतीने दुर्घटनाग्रस्तांची मदत केली जात आहे. उपचारासंबंधीची कोणतीही मदत लागल्यास 8086010833 आणि 9656938689 या दोन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वैथिरी, कालपट्टा, मेप्पाडी मनंथावडी या भागातील रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहेत. भूस्खलनाची घटना घडताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी लवकरच आणखी आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. (Wayanad Landslide)

केंद्र सरकारकडून मदत जाहीर!
वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली असून केरळ सरकारला संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत केंद्र सरकार करेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना दिलं आहे. तसेच या भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. (Wayanad Landslide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.