आम्ही Vote देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या; विद्यार्थ्यांची पालकांना साद

107

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर “सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम” अर्थात स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी ठाणे शहरात 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी प्रत्यक्षरीत्या बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला बसमध्ये विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

(हेही वाचा ‘लाडकी बहीण’ सारख्या कल्याणकारी योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा; CM Ekanath Shinde यांचे आवाहन)

शाळकरी मुलांना मतदानाचे (Vote) महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी चक्क बसमध्ये “आई-बाबास पत्र” हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत (Vote) देऊ शकत नाही पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान क्रेंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गानी विविध घोषणा देऊन मतदानाचा Vote) जागर करण्यात आला. “मतदान करा, मतदान करा.. लोकशाहीचा विजय करा” या संकल्पनेतून सर्व नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी न चुकता मतदान करा, असा प्रेरक संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.