Ravan Dahan In Delhi : प्रभु श्रीरामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रावणदहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभु श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची पूजा केली. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांची आरती केल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले. दिल्लीतील द्वारका सेक्टर 10 येथील रामलीला मैदानावर पंतप्रधानांच्या हस्ते रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

219
Ravan Dahan In Delhi : प्रभु श्रीरामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रावणदहन
Ravan Dahan In Delhi : प्रभु श्रीरामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रावणदहन

आज आपण भाग्यवान आहोत, की आपल्याला राममंदिराच्या निर्मितीचे कार्य पाहायला मिळत आहे. (Ravan Dahan In Delhi) पुढील रामनवमीला अयोध्येतील रामलल्ला मंदिरातील पूजा संपूर्ण जगाला आनंद देणार आहे. रामजन्मभूमीवर उभारले जाणारे भव्य मंदिर हे शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर भारतियांच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रभु श्रीरामाची प्रतिष्ठापना राममंदिरात होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. जग भारताकडे लोकशाहीची माता म्हणून पाहत आहे. प्रभु श्रीरामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील द्वारका येथील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या विजयादशमी सोहळ्यात सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचले आणि त्यांनी प्रार्थना केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभु श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची पूजा केली. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांची आरती केल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले. दिल्लीतील द्वारका सेक्टर 10 येथील रामलीला मैदानावर पंतप्रधानांच्या हस्ते रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. (Ravan Dahan In Delhi)

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीला आज देशभरात रावणदहन केले जात आहे. रावणदहनाने गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेली रामलीला येथे संपणार आहे. विजयादशमी हा सण देशाच्या जवळपास सर्वच भागांत साजरा केला जातो.  ‘हा सण आमच्यासाठी आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्याची संधी आहे. उत्कटतेवर संयमाच्या विजयाचा हा सण आहे. अहंकारावर विजय मिळवण्याचा हा सण आहे. विजयादशमीला शस्त्रपूजनही केले जाते. शस्त्रांची पूजा वर्चस्वासाठी नव्हे, तर संरक्षणासाठी केली जाते’, असे पंतप्रधान मोदी यांनी येथील द्वारका रामलीला मैदानावर सांगितले. (Ravan Dahan In Delhi)

(हेही वाचा – Maratha Reservation : धनगर आरक्षणासाठी मदत करणार, जरांगे-पाटील यांचे आश्वासन)

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ”हा सण आपल्यासाठी संकल्पांचा उत्सव आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याचा सण आहे. चंद्रयान चंद्रावर जाऊन दोन महिने पूर्ण होत असताना यावेळी आपण विजयादशमी साजरी करत आहोत. आपल्याला गीतेचे ज्ञान आहे आणि विज्ञान देखील माहित आहे. नवरात्रीत आईचे स्मरण करण्यासाठी शक्तीपूजनाचा संकल्प आणि मंत्र देखील आपल्याला माहित आहेत. विजयादशमी हे या विचारांचे प्रतीक आहे. आज रावणाचे दहन हे केवळ एका पुतळ्याचे दहन नसून समाजातील एकोपा बिघडवणाऱ्या प्रत्येक विकृतीचे दहन व्हायला हवे. देशाच्या प्रत्येक वाईटाविरुद्ध देशभक्तीचा उत्सव साजरा केला पाहिजे.” (Ravan Dahan In Delhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.