मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडाच्या दूतावासासमोर निदर्शने करू; Hindu Janjagruti Samiti चा इशारा

29
मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडाच्या दूतावासासमोर निदर्शने करू; Hindu Janjagruti Samiti चा इशारा

सोमवारी कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागातील हिंदू मंदिरावर ‘सीख फॉर जस्टीस’ या संघटनेने आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला; मात्र या हिंसक हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठिशी घालण्याचा प्रकार कॅनडा सरकारने केला आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यापूर्वीही कॅनेडामध्ये मंदिरांवर हल्ले झाले आहेत. कॅनडा सरकारने हे सर्व हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा कॅनड सरकारला जागे करण्यासाठी भारतातील त्यांच्या दूतावासासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे. (Hindu Janjagruti Samiti)

(हेही वाचा – मानखुर्दमध्ये Abu Azmi यांचा प्रचार उबाठाचे शिवसैनिक करणार)

भारतीय उच्चायुक्त हे कॅनडातील मंदिराच्या भेटीसाठी जाणार हे माहिती असतांनाही त्यांच्या आणि मंदिर यांच्या सुरक्षेसाठी वा सदर हल्ला होऊच नये म्हणून कॅनडा सरकार काहीही ठोस कृती केलेली नाही. त्यामुळे या हल्ल्याला कॅनडा सरकारची मुकसंमती होती का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडामध्ये हिंदूंवरील, तसेच मंदिरांवरील हल्ले रोखण्यात कॅनडा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे भारत सरकारने हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून कॅनडा सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे, अशी आमची भारत सरकारकडे मागणी आहे. हल्लेखोर संघटनेचे भारतात जे कोणी पाठिराखे असतील, त्यांच्यावर भारत सरकारने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. (Hindu Janjagruti Samiti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.