ऐन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील पावसाचे संकट अद्याप कायम असून हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे. बुधवारपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. राज्यात अजूनही पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. त्यामुळे मुंबईच्या तापमानाचा पारा 9 अंशाने घसरला आहे.
स्वेटर घालावे की रेनकोट?
आता मुंबईत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अशा अवकाळी पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सरकारकडून तसेच हवामान खात्याकडूनही करण्यात आले आहे. तर या पावसामुळे मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. मुंबईचे तापमान 33.3 अंश सेल्सियस होते ते आता बुधवारी दिवसभर झालेल्या पावसाने घटून 24.8 अंश सेल्सिअस वर घसरला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पडणा-या पावसामुळे आता स्वेटर घालावे, की रेनकोट असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
‘या’ भागात पावसाची शक्यता
ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही धांदल उडाली आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.
- गुरुवार 2 डिसेंबर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर
- तर अहमदनगर, पुणे, कोल्हापूर , सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसणार आहे.
(हेही वाचा: मुलीला लग्नासाठी विचारणे, ओढणी ओढणे ‘पाॅक्सो’ अंतर्गत गुन्हा नाही! उच्च न्यायालयाचा आदेश )