गेल्या महिन्यापासून राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. येत्या काही दिवसात नागरिकांना आणखी उष्मा सहन करावा लागण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या ४८ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा इशारा दिला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
( हेही वाचा : आता मिळवा मोफत आरोग्य सेवा! कशी ते वाचा… )
उष्णतेचा इशारा
देशाच्या वायव्येकडील राज्यांत उष्णतेची तीव्र लाट असून तेथून महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. सततच्या कोरड्या हवामानामुळे वायव्य भारताला उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दिल्ली ते गुजरातपर्यंत पुढील ४-५ दिवस उष्णतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यलो अलर्ट जारी
नागपूर हवामान विभागाने येत्या पाच दिवसांसाठी वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
- ९ एप्रिल – बुलढाणा, अकोला
- १० एप्रिल – बुलढाणा, अकोला
- ११ एप्रिल – बुलढाणा
दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ७ एप्रिलला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर येथे वादळी पावसाने हजेरी लावली. तसेच सांगलीत काही ठिकाणी गारपीट झाली.
Join Our WhatsApp CommunityNext 5 days weather warning for Vidarbha Dated 07.04.2022 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/1iG4To66Mq
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) April 7, 2022