मध्य महाराष्ट्रालाही उष्णतेच्या झळा

गुरुवारपासून मध्य महाराष्ट्रात तापमान वाढीने नवा रेकॉर्डने केला आहे. भारतीय हवामान खा्त्याने दिलेल्या अंदाजानुसार, जळगावसह मध्य महाराष्ट्रात शनिवारीही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील.

विदर्भात उष्णतेच्या लाटांमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागांत कमाल तापमानाने काहिली केली. पुणे, सोलापूर, परभणी तसेच मालेगावात कमाल तापमानाने सलग दुस-या दिवशी तीन वर्षांपूर्वीचा एप्रिल महिन्याच्या कमाल तापमानाचा रेकॉर्ड मोडला.

हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचारी ६ मे रोजी करणार निदर्शने! )

विदर्भवगळून राज्यातील ४० अंशापुढे गेलेले कमाल तापमान – अंश सेल्सिअस

  • जळगाव – ४४.८
  • परभणी – ४४.२
  • मालेगाव – ४३.६
  • सोलापूर – ४३.४
  • पुणे – ४०.१
  • सोलापूर – ४३.४
  • उस्मानाबाद – ४२.४
  • नांदेड – ४३.२
  • अहमदनगर – ४३.६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here