देशात जून ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील सरासरी तापमानाची नोंद (Weather Forecast) इतिहासातील सर्वोच्च तापमान अशी हवामान केली असून २०१६ नंतर २०२३ हे इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते. या उष्णतेमुळे थंडीचे चक्रच बिघडले आहे. जानेवारी २०२४ मध्ये जास्त हिवाळा नसेल. थंडीची लाट येण्याची शक्यताही कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
एल निनो हे त्याचे प्रमुख कारण आहे. दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामान बदलास ‘एल निनो’ म्हणतात. त्यामुळे जोरदार उष्ण वारे वाहत आहेत. एल निनोची सकारात्मक स्थिती फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केला आहे. म्हणूनच फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
(हेही वाचा – Ginger Benefits : केवळ खोकला आणि सर्दीसाठीच नाही, तर या 5 आजारांमध्येही उपयुक्त आहे आले)
‘एल निनो’चा प्रभाव एप्रिलपासून कमी, हे मान्सूनसाठी चांगले …
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोची परिस्थिती एप्रिलपासून कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून चांगला ठरणार आहे. ४ महिन्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये, पावसाळ्यात एल निनोची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे तर त्यानंतरही तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले गेले होते. पाऊसही नेहमीपेक्षा कमी होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community