मुंबईचे तापमान ३८ अंशावर! मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस? काय आहे हवामान विभागाचा अंदाज

मुंबईसह उपनगरातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये शनिवारी उष्णतेच्या लाटेची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.५, तर कुलाबा येथे ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच, कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये ही परिस्थिती असताना विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे हरभरा, गहू पक्वका अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

( हेही वाचा : देशात H3N2 चा उद्रेक! नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन)

पावसाचा अंदाज 

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ मार्चपासून पावसाची शक्यता आहे. हे वातावरण १७ मार्चपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पुणे विभागात ढगाळ वातावरण होत आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here