राज्यातील तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. २१ मार्चपर्यंत ४४ अंशांपर्यंत राज्यातील तापमान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ १२ केंद्रांवर होणार ‘१२ ते १४’ वयोगटातील मुलांचे लसीकरण! )
राज्याच्या कमाल तापमानात वाढ होणार असून कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसानंतर उन्हाचा चटके वाढू लागले आहे. १६ जानेवारी २०२२ बुधवारपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होणार असून, काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कोकणासह, गुजरात, पश्चिम राजस्थान, कर्नाटक किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरीसह, डहाणू, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा ३७ अंशांपार गेल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत.
या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
हवामान विभागाने १६ मार्चला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईसह काही शहरांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. या काळात भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही नागरिकांना दिला जात आहे.
Join Our WhatsApp CommunityHeat wave to severe heat wave conditions are very likely over parts of Konkan-Goa, including Mumbai during next 3 days.
येत्या 3 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/IV86u716BN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 14, 2022