राज्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर गेला आहे. तर मंगळवारी चंद्रपूरात कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले होते. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये तापमानाचा पारा चाळीशी गाठतो परंतु यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडयातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
( हेही वाचा : मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत )
२ एप्रिलपर्यंत राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट
- २९ मार्च
बुलढाणा, अकोला, नागपूर - ३० मार्च
अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर - ३१ मार्च
चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा - १ एप्रिल
बुलढाणा, अकोला - २ एप्रिल
बुलढाणा, अकोला
Next 5 days weather warning for Vidarbha Dated 29.03.2022 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/mgc9Y0wrqz
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) March 29, 2022
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
- विशेषत: दुपारी 12.00 ते 3.00 दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा.
- तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
- दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर काम करणे टाळा.
- ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेये प्या ज्यामुळे हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.
- उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.