राज्यात थंडी आणि धुक्यासह पावसाची रिमझिमही (Weather Update) पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
(हेही वाचा – India Alliance : नव्या वर्षात इंडी आघाडी फुटणार ?; काय म्हणाले रवी राणा…)
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची शक्यता –
हवामान खात्याने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात म्हणजेच १ ते ७ जानेवारी या दिवसांमध्ये हवामानात बदल होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील १७ तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये १ ते ७ जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : राम मंदिराच्या उभारणीने सुरु होणारे नववर्ष महाराष्ट्रासाठी सुद्धा उत्साहवर्धक)
हवामान खात्याचा अंदाज –
भारतीय हवामान विभागाने २ जानेवारीपर्यंत धुक्याची परिस्थिति (Weather Update) कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि चंदीगडच्या काही भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. दरम्यान दाट धुक्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विमान आणि रेल्वे सेवा दोन्ही उशिराने धावत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community