एकीकडे उत्तर भारतात थंडीची लाट कायम असतानाच दुसरीकडे मात्र दक्षिण भारतात पावसाची (Weather Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यामध्ये पुढील ४८ तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी (५ जानेवारी) बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले होते.
(हेही वाचा – Indian Navy : समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांची सखरूप सुटका;मार्कोस कमांडोंची भरीव कामगिरी)
दिल्लीमध्ये धुक्याची चादर –
तर दिल्लीच्या काही भागांमध्ये शुक्रवारी सकाळी दाट धुके (Weather Update) पडले होते. हवामान विभागाने आज, शनिवारी देखील दिल्लीत काही ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता असून थंड वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पहाटे पंजाब आणि दिल्लीच्या एकाकी भागात खूप दाट धुके दिसले.
(हेही वाचा – Aditya L1 ची आज खरी परीक्षा; भारत आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज)
दक्षिण भारतासाठी येलो अलर्ट जारी –
दरम्यान दक्षिण भारतासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट (Weather Update) जारी केला आहे. कन्नड, उडुपी, कोडागु आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात शनिवारी आणि रविवारी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील नागपूर आणि सभोवतालच्या भागात शनिवारी ढगाळ वातावरण होते. (Weather Update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community