संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा (Weather Update) जाणवत असताना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शाहुवाडीत मात्र अवकाळी पावसाने (Heavy rain) जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. तापमान सतत वाढत असून उन्हाचा तडाखा अधिक जाणवत होता. मात्र, अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. (Weather Update)
हेही वाचा-State Kho Kho Championship 2025 : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार
15 मार्च रोजी दिल्ली एनसीआर (Delhi NCR) आणि त्याच्या आसपासच्या भागात झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD Alert) , पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये शनिवारी हलक्या रिमझिम पावसाची नोंद झाली. रविवारीही दिल्लीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश से. असू शकतं. शुक्रवार हा दिल्लीतील सर्वात उष्ण दिवस होता. (Weather Update)
हेही वाचा-Social media Manager : सोशल मीडिया मॅनेजर काय करतो?
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 16 मार्चपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा आहे. पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारतात प्रवेश करत असून, यामुळे दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. दुसरे चक्रीवादळ बांगलादेशातून येणार असून, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. 16 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि वादळी पावसाचा इशारा आहे. (Weather Update)
हेही वाचा-Bank Strike : बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँका सलग ४ दिवस बंद
पंजाब आणि हरियाणा – 12 आणि 13 मार्चला मेघगर्जनेसह पाऊस
राजस्थान – 13 ते 16 मार्च दरम्यान वादळ आणि वादळी वाऱ्यासह पाऊस
बिहार आणि पश्चिम बंगाल – जोरदार पावसाची शक्यता
अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य राज्ये – मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा
दक्षिण भारत – तामिळनाडू, केरळ येथे अतिवृष्टीचा अंदाज (Weather Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community