फेंगल चक्रीवादळाने (Cyclone Fengal) भारतातील दक्षिणेतील राज्यांना (Weather Update) तडाखा दिला आहे. येथील किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा फटका बसला. आता या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. तर मुंबईत हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. हिवाळ्यात पावसाचे आगमन झाल्याने मुंबईकर (Mumbai Rain) गोंधळले आहेत. (Weather Update)
हेही वाचा- Rabi Crops : ढगाळ हवामानाचा कांद्यासह रब्बी पिकांना फटका
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहणार असून आज (४ डिसेंबर) मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील हवामान सध्या ढगाळ व दमट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानातही वाढ झाली आहे. IMD ने आज बुधवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात (Konkan) सिंधूदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. (Weather Update)
हेही वाचा- Insta वर Shriram, Sita, Hanuman यांचे अश्लील विडंबन; भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, फेंगल चक्रीवादळाने सध्या कर्नाटकाच्या सागरी भागासह अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा दाब दोन दिवसात येत्या दोन दिवसात पुढे सरकणार असून हळूहळू कमकुवत होणार आहे. त्यामुळे तळकोकणातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)
हेही पहा-