Weather Update: घामाच्या धारा लागणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार

49

मुंबई (Mumbai) म्हटली की घामाच्या धारा लागतात. मात्र उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रही गारठला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान १३ तर मुंबई महानगर प्रदेशाचे तापमान (Mumbai Metropolitan Region Temperature) १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून, शुक्रवारनंतर मात्र तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. (Weather Update)

उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे (snowfall) मुंबईसह राज्यभरातील गारठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारपर्यंत गारठा राहील. मुंबई महानगरात किमान तापमान १२ ते १४ राहील. त्यानंतर यात हळूहळू वाढ होईल, असे हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी सांगितले.

मुंबईसह कोकणात मंगळवारी पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली होते. मुंबईत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशाने कमी म्हणजे १५.२ इतके होते. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात थंडी जाणवेल. ११ जानेवारीपासून पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहील.

मुंबई महानगर प्रदेश (स्त्रोत – वेगरिज ऑफ दी वेदर)

  • मुंबई    १५.२
  • ठाणे    १६.३
  • नवी मुंबई    १६.५
  • पनवेल    १५.७
  • कल्याण    १५.५
  • डोंबिवली    १५.७
  • उल्हासनगर    १५.१
  • तलासरी    १२.५
  • बदलापूर    १३.७
  • कर्जत    १३.९
  • अंबरनाथ    १४.९

राज्य (स्त्रोत – हवामान विभाग)

मुंबईसह कोकणात मंगळवारी पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली होते. मुंबईत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशाने कमी म्हणजे १५.२ इतके होते. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व  महाराष्ट्रात थंडी जाणवेल. ११ जानेवारीपासून पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात (Marathwada) कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहील.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.