Weather Update: राज्यात थंडीनंतर पुन्हा पावसाळा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

112
राज्यात यंदा कडक्याच्या थंडीनंतर पुन्हा पावसाच्या हालक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबरपासून वातावरण ढगाळ (Weather cloudy) राहण्याची शक्यता आहे. परिणामी 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामांतज्ञानी डिसेंबर आखेरीस होत असलेल्या वातावरण बदलावर हवामान विभागाने (Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. (Weather Update)

राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असून, २७ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची शक्यता आहे. २६ आणि २७ डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.तर २६ रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि २७ रोजी अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar, head of Pune Meteorological Department) यांनी सांगितली.

(हेही वाचा – Dadar Hawker : दादरमध्ये मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, बाहेरच्यांना संरक्षण)

मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसत आहे. सोमवारपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना थंडी-ताप अन् खोकल्याचा त्रास जाणवत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या (Mumbai Pune Weather) ठिकाणी हवेची पातळी अधिकच खालावली आहे. त्यामुनळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.