Weather Update: मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; तर नाशिक, पुणे गारठलं!

40
राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात (Climate change) कमालीचे बदल जाणवत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना आता काहीसा दिसाला मिळत आहे. राज्यातील (Maharashtra Winter Weather Alert) अनेक भागांत हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) या आठवड्यात उत्तरेकडील वारे मजबूत झाल्याने हंगामातील कमी तापमानाचा नवा विक्रम निर्माण करतील. असे हवामान विभागाच्या वतीने संगण्यात आले. (Weather Update)

दरम्यान मुंबईतील अनेक ठिकाणी तापमान 16-17 अंश सेल्सिअसच्या खाली, तर एमएमआरमध्ये 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यात सुद्धा तापमान 10-11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई पाठोपाठ नाशिक आणि निफाडचा पारा दोन अंशांनी घसरला आहे. नाशिकमध्ये आज 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा 8 अंशावर आला असून निफाड मध्ये 8.8 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

(हेही वाचा – २६ नोव्हेंबर हा दिवस Indian Constitution Day म्हणून का साजरा केला जातो ?)

मुंबईत यंदाचा मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद 
मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील किमान तापमानात घट (temperature Drop) झाली असून मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर 16.8 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, कुलाब्यातही तापमान 22.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे.  
 राज्यातील काही प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
शहरं 
तापमान
अहमदनगर
9.7
पुणे
10.8
संभाजीनगर
12.1
जालना
10.8
जेऊर
10.5
उदगीर
11.5
नाशिक
10.8
नांदेड
11.8
कोल्हापूर
15.7
बारामती
11.7
महाबळेश्वर
12.6
  हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.