Weather Update: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, मात्र कोकण अन् मध्य महाराष्ट्रात तापमानात होणार वाढ, IMD ने काय दिला इशारा?

59

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. राज्यभरात किमान तापमानात चढ-उतार होत असून, सकाळच्या गारव्यात कायम असलेल्या थंड हवामानाने (weather) दुपारच्या उन्हाळ्याला वेग दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय घट होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये तापमान 1-2 डिग्रीने घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात किमान तापमानाचा (Temperature) पारा आता 15-23 अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. (Weather Update)

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून वाढलेल्या किमान तापमानाच्या पाऱ्यात आता 1-2 अंशांनी घट होणार आहे. तर कमाल तामपानात वाढ होणार आहे. येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे वातावरण राहणार असून पावसाची शक्यता नाही. कोकण,  मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात  काहीशी घट होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढू लागेल. तर कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज देण्यात आल्याने उकाड्याचा सामनाही करावा लागेल.

मुंबईसह कोकणात काय स्थिती?
मुंबईतील कोलाबा येथे शुक्रवारी किमान तापमान 21.2 डिग्री तर सांताक्रूझ येथे 19.3 डिग्री सेल्सियस होते. कोकण आणि गोवा भागांमध्येही तापमान (Konkan temperature) कमी होणार असल्याने येत्या काही दिवसांत सकाळच्या गारव्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

(हेही वाचा – Pune Accident: नवले पुलावर कारची बसला धडक ; दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी)

मराठवाड्यात तापमानातील घट
मराठवाड्यात (Marathwada temperature) सध्या किमान तापमान 17-20 डिग्री सेल्सियस दरम्यान नोंदवले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 17.8 डिग्री तर लातूरमध्ये 19.9 डिग्री सेल्सियस होते. पुढील पाच दिवसांत मराठवाड्यात तापमानात 2-3 डिग्रीची घट होईल आणि शुष्क वाऱ्यांचा जोर जाणवेल.

हवामान विभागाचा अंदाज काय?
आसाम आणि परिसरात सध्या चक्राकार वाऱ्यांचे झोत सक्रीय आहेत. त्यामुळे पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्याचे झोत असल्याने थंडीत चढउतार होत आहे. भारतीय हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालं असून येत्या तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. परिणामी तापमानावर (temperature) त्याचा परिणाम होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.