राज्यात थंडी आणि धुक्यासह पावसाची रिमझिमही (Weather Update) पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी –
हवामान खात्याने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात हवामानात बदल होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच महाराष्ट्र, राजस्थानमध्ये पुढील तीन ते चार दिवस तर 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 पर्यंत तामिळनाडू येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
(हेही वाचा – BEST Buses : रविवारी ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री ‘बेस्ट’च्या २५ जादा बसगाड्या)
हवामान खात्याचा अंदाज –
भारतीय हवामान विभागाने 2 जानेवारीपर्यंत धुक्याची परिस्थिति (Weather Update) कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि चंदीगडच्या काही भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. दरम्यान दाट धुक्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विमान आणि रेल्वे सेवा दोन्ही उशिराने धावत आहे.
(हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; तब्बल १२२ क्षेपणास्त्रे आणि ३६ ड्रोनचे प्रक्षेपण)
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहूडी –
काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी (Weather Update) पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही होत असल्याचं दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community