राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तवली आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे, कल्याण आणि पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
ऐन दिवाळी पाऊस पडल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहिल तसेच येत्या ४ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावासाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
(हेही वाचा – ब्रिटिशांकडे कायद्यात बदल करण्याची मागणी करणारे महान क्रांतिकारक Surendranath Banerjee)
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट…
मुंबईत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे तसेच येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.