Weather Update : मुंबईसह राज्याच्या अनेक भागात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. सध्या तापमान चाळीस अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्याचे आव्हान असतानाच आता उन्हाळ्यामुळे घाम, उन्हाचा चटक्याचे परिमाण त्वचेवर होत आहे. अशातच ठाण्याचे कमाल तापमान ४०, तर मुंबईचे ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. एमएमआरमधील उष्णतेची (heat) लाट मंगळवारी आणि बुधवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईचा पारा ३६ अंशाच्या आसपास घुटमळेल, असा हवामान विभागाचा (Department of Meteorology) अंदाज आहे. (Weather Update)
(हेही वाचा – रॉयल्टी बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे आदेश)
राज्यात तापमान वाढीची परिस्थिती काय ?
राज्यात मागील आठवड्यातील पावसाच्या वातावरणामुळे उन्हाच्या कडाक्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी जालना जिल्ह्याचे तापमान तब्बल ४३ अंशांवर पोहोचले होते. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांच्या तुलनेत किमान तापमान ३ तर कमाल तापमानात २ अंशांनी वाढ झाल्याने उकाड्याने नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे.
(हेही वाचा – सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी Mumbai Police दल सक्षम; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास)
या वर्षी मार्च महिन्यात दोन वर्षांचा रेकॉर्ड मोडत तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचला होता. तसेच या महिन्यात वाढलेले सर्वाधिक तापमान म्हणून नोंद झाली. मात्र, हे तापमान अवघ्या दोन दिवसांसाठी राहिले. दरम्यान, १ एप्रिलपासून सुरू झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम शनिवार, ६ एप्रिलपर्यंत कायम होता. त्यानंतर मात्र उन्हाच्या कडाक्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी तापमान ४० अंशांवर होते, तर २३ अंशांपर्यंत खाली आले होते. सोमवारी यात वाढ झाल्याने दिवसभर वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. दरम्यान, बाजारात लग्नसराईमुळे गर्दी होत आहे. ऐन वाढत्या तापमानात सुरू असलेल्या खरेदीसाठी नातेवाइकांची दमछाक होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community