महाराष्ट्रात मान्सूनचे (Maharashtra Mansoon) आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे. सध्या गोव्यात (Goa Mansoon) दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची अपेक्षा आहे. मान्सूनचं प्रतिक्षा लागलेली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसानं झोडपलं आहे. तर गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather Update)
तसेच, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गुरुवारी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: सत्तास्थापनेबाबत संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले… )
सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना गुरुवारी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community