राज्यात गेले काही दिवस अनेक जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात पुढील २४तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.काही भागांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. देशासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. (Weather Update)
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हें
राज्यात अवकाळी बरसणार
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(हेही वाचा :Ind vs Ned : विराटच्या पहिल्या विश्वचषक बळीनंतर अनुष्का शर्माची भन्नाट प्रतिक्रिया )
थंडी चा जोर पुन्हा कधी वाढणार
दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे या काळात थंडीमध्ये वाढ होईल.रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हेही पहा –