Wedding Expenses : भारतात लग्न समारंभावर कुटुंब सरासरी किती रुपये खर्च करतात माहीत आहे?

Wedding Expenses : भारतात सरासरी उत्पन्नापेक्षा लग्नावर होणारा खर्च जास्त आहे.

159
Indian Wedding : भारतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार ३५ लाख लग्न, ४.२५ कोटी रुपयांचा खर्च
  • ऋजुता लुकतुके

भारतात शिक्षणापेक्षाही जास्त खर्च लग्न समारंभांवर होत आहे. देशातील प्रत्येक कुटुंब एका लग्नावर सरासरी १२ लाख रुपयांचा खर्च करत आहे. जेफरीजच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भारतात लग्नाची बाजारपेठ आता १३० अब्ज अमेरिकन डॉलरची बनली आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. (Wedding Expenses)

इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म जेफरीजच्या अहवालानुसार भारतीय विवाह उद्योग अमेरिकेच्या दुप्पट आकाराचा आहे. जेफरीजचा अंदाज आहे की भारतात लग्नासाठी सरासरी खर्च १४,५०० डॉलर किंवा १२ लाख रुपये इतका आहे. भारतात दरडोई उत्पन्नाच्या ५ पट लग्नावर खर्च होत आहे. एक भारतीय जोडपे लग्नावर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च करत आहे. दुसरीकडे, अमेरिकेत लग्नांवर होणारा खर्च हा शिक्षणावरील खर्चाच्या निम्मा आहे. (Wedding Expenses)

(हेही वाचा – Mumbai Hawkers : फेरीवाल्यांवर धडक कारवाई; एका आठवड्यात ७१३ हातगाड्या, १,०३७ सिलिंडर जप्त)

ज्वेलरी उद्योगाचा निम्म्याहून अधिक महसूल ‘या’ कारणामुळे येतो 

भारतातील कुटुंबांचे सरासरी उत्पन्न वार्षिक ४ लाख रुपये आहे. असे असूनही तो आपल्या सरासरी उत्पन्नाच्या तिप्पट खर्च विवाहसोहळ्यांवर करत आहे. अहवालानुसार, भारतात दरवर्षी ८० लाख ते एक कोटी विवाह होतात. हा आकडा संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. विवाह सोहळ्यांमुळे दागिने, कपडे, इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग आणि मनोरंजन यांसारखे व्यवसायही भरभराटीला येत आहेत. भारतात होणाऱ्या लग्झरी विवाहसोहळ्यांवर होणारा खर्च सरासरीपेक्षा कितीतरी जास्त आहे. (Wedding Expenses)

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात आजकाल लग्नाआधीच्या भव्य कार्यक्रम आणि समुद्रपर्यटन इत्यादींवर पैसे खर्च केले जात आहेत. ज्वेलरी उद्योगाचा निम्म्याहून अधिक महसूल वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून येतो. लग्नसाईच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची उलाढाल होत असते. दरवर्षी हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या पुढे जात असतो. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी विक्री झाली आहे. दरम्यान, यावर्षी सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा फटका काही ठिकाणी बसला आहे. वाढत्या दरामुळं नागरिकांनी सोन्या चांदीच्या खरेदीकडं पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले होते. लग्नासराईच्या काळातच भारतात मोठ्या व्यवसाय होत आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना परदेशात न जाता भारतात लग्न करण्याचे आवाहन केले होते. (Wedding Expenses)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.