लग्नाळुंसाठी यंदाच्या वर्षी चांगली बातमी आहे. लग्नाचे मुहूर्त मिळत नाहीत, म्हणून अनेक जण काडीव मुहूर्त काढून लग्न आटोपतात, पण यंदाच्या वर्षी लग्नाच्या मुहूर्तासाठी अशी तडजोड करण्याची गरज भासणार नाही. कारण यंदाच्या वर्षी लग्नाचे मुहूर्त बरेच आहेत. काळजी नसावी.
२०२३ या वर्षात तब्बल ८ महिने लग्न सोहळे चालणार आहेत. वर्षातील जुलै ते ऑक्टोबर हे ४ महिने वगळले तर उर्वरित ८ महिने विवाह सोहळे करता येणार आहेत. हिंदू धर्मात लग्नासाठी मुहूर्ताला विशेष महत्व आहे. त्यासाठी विवाह मुहूर्त काढले जातात. हिंदू पंचांगानुसार 2023 मध्ये लग्नासाठी तब्बल ६४ शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारी महिन्यात १३, मार्चमध्ये ६, मे मध्ये १३, जूनमध्ये ११, नोव्हेंबरमध्ये ५ आणि डिसेंबरमध्ये ७ विवाहाचे शुभ मुहूर्त आहेत.
२०२३ मध्ये विवाहासाठी हे आहेत मुहूर्त
- जानेवारी – १५, १६, १८, १९, २५, २६, २७, ३०, ३१
- फेब्रुवारी – ६, ७, ८, ९, १०, १२, १३, १४, १५, १७, २२, २३, २८
- मार्च – १, ५, ६, ९, ११, १३
- मे – ६, ८, ९, १०, ११,१ ५, १६, २०, २१, २२, २७,२९, ३०
- जून – १, ३, ५, ६, ७, ११, १२, २३, २४, २६, २७
- नोव्हेंबर – २३, २४, २७, २८, २९
- डिसेंबर – ५, ६, ७, ८, ९, ११, १५