प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे भुसावळ ते मुंबई सेंट्रल दरम्यान त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : मुरुडमध्ये काशिद समुद्र किनाऱ्यावर ५ विद्यार्थी बुडाले; दोघांचा मृत्यू)
विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे…
ट्रेन क्रमांक ०९०५२ विशेष दि. ११.०१.२०२३ ते ०१.०४.२०२३ या कालावधीत भुसावळ येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.२० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०५१ विशेष गाडी दि. १०.०१.२०२३ ते ३१.०३.२०२३ कालावधीत दर रविवारी, मंगळवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रल येथून २३.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता भुसावळला पोहोचेल.
थांबे – जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, सिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, व्यारा, बारडोली, भेस्तान, नवसारी, वलसाड, वापी, बोईसर, बोरीवली.
संरचना – एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण : 09052 विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 10.01.2023 रोजी सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करावे आणि प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करावे असे आवाहन रेल्वेने केले आहे.