WEH Andheri Bridge : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवर MMRDAचे दुर्लक्ष, महापालिका करणार १०० कोटींचा खर्च

विशेष म्हणजे सव्वा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलेल्या या पुलासाठीचा खर्चच सुमारे १०० कोटींच्या घरात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मागील काही काळात एमएमआरडीएने या पुलाच्या दुरुस्तीसाठी काहीच खर्च नसल्याचे स्पष्ट होते.

1516
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील Andheri Bridge चा वाद न्यायालयात, तरीही महापालिकेच्यावतीने दुरुस्ती!
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीने (MMRDA) महापालिकेला डिसेंबर २०२२मध्ये हस्तांतरीत केल्यानंतर या रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पावसाळापूर्वीची डागडुजी करण्यात येत आहेत शिवाय ऍक्सेस कंट्रोलच्या दृष्टीकोनातही शेकडो कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. त्यातच आता एमएमआरडीएकडून (MMRDA) ताब्यात आलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्व येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामही आता महापालिकेच्यावतीने हाती घेतले जात आहे. यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या रस्त्यांवरच आता कोट्यवधी रुपये खर्च होऊ लागले आहेत. (WEH Andheri Bridge)

(हेही वाचा – Supriya Sule: ज्यांच्याविरोधात लोकसभेचा लढा त्यांच्याचकडून घेतलंय लाखोंचं कर्ज; सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड)

एमएमआरडीएने सातत्याने केली डांबरीकरणाची कामे

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्वमधील उड्डाणपूलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने १ एप्रिल २०२४ रोजी निविदा मागवली आहे. मात्र, यासाठी निविदा पूर्व बैठक न घेताच या निविदेची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. परंतु या निविदेच्या प्रक्रियेत सुधारणा करून यासाठीची निविदा भरण्याची तारीख २५ एप्रिल २०२४ अशी करण्यात आली. या निविदेसाठी दुरुस्ती कामांची अंदाजित किंमत ९५.८९ कोटी रुपये एवढी दर्शवण्यात आली आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या निविदाकाराने अंदाजित दराच्या तुलनेत किमान ३० टक्के रकमेचे काम मागील सात वर्षांमध्ये केलेले असावे अशाप्रकारची अट घातली आहे. (WEH Andheri Bridge)

विशेष म्हणजे सव्वा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलेल्या या पुलासाठीचा खर्चच सुमारे १०० कोटींच्या घरात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मागील काही काळात एमएमआरडीएने या पुलाच्या दुरुस्तीसाठी काहीच खर्च नसल्याचे स्पष्ट होते. एमएमआरडीएने (MMRDA) फेब्रुवारी २००४मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गवरील अंधेरी उड्डाणपूल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंतच्या डांबरीकरणाच्या कामांसाठी सुमारे २४ कोटी रुपयंचा खर्च केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हा खर्च केल्यानंतर सातत्याने एमएमआरडीएने डांबरीकरणाची कामे केलेली आहे. परंतु या पुलाच्या दुरुस्तीवर कोणत्याही प्रकारचा खर्च केलेला नाही. युती सरकारच्या काळात बांधलेला पूल असून या पुलाच्या खालील बाजुस कमर्शियल वापराचे गाळे बांधण्यात येणार होते. परंतु यासाठी नियुक्ती केलेल्या कंत्राटदाराने कसेबसे हे उड्डाणपूल बांधून दिले, परंतु त्यामध्ये कमर्शियल गाळे काही उभे राहिले नाही. गोल्डस्पॉट, चकालासह एकूण तीन सिग्नल पार करणारा हा या मार्गावरील मोठा पूल होता. (WEH Andheri Bridge)

(हेही वाचा – Deepak Kesarkar : शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले; दीपक केसरकरांचा आरोप)

पुलांच्या डागडुजीवरच कोट्यवधी रुपये खर्च

परंतु एमएमआरडीएकडून (MMRDA) हा पुल ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेच्या पुल विभागाच्यावतीने नियुक्त केलेल्या सल्लागारांकडून या पुलाचा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये पुलाची बेअरींगसह अन्य प्रकारची कामे कंत्राटदाराने सुचवली आहे. त्यामुळे या दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेने निविदा मागवली आहे. त्यामुळे एकप्रकारे एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या रस्त्यांसह पुलांच्या डागडुजीवरच कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याने केवळ दुरुस्तीसाठीच हे रस्ते व पूल एमएमआरडीएने महापालिकेला हस्तांतरीत केल्याचे स्पष्ट होते. (WEH Andheri Bridge)

पुल विभागाचे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एमएमआरडीएकडून (MMRDA) पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी पूर्व येथील उड्डाणपूल महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर बांधकामाच्या दृष्टीकोनातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात सल्लागाराने दुरुस्तीबाबत काही सुचना केल्या आहेत. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या आहेत. याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. परंतु एमएमआरडीएने (MMRDA) याची दुरुस्ती यापूर्वी केली किंवा नाही याबाबत महापालिकेला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. (WEH Andheri Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.