Welcome 2025 : ख्रिस्ती नववर्षाच्या प्रथम दिनी तीर्थक्षेत्रे भाविकांनी फुलली

56
Welcome 2025 : ख्रिस्ती नववर्षाच्या प्रथम दिनी तीर्थक्षेत्रे भाविकांनी फुलली
Welcome 2025 : ख्रिस्ती नववर्षाच्या प्रथम दिनी तीर्थक्षेत्रे भाविकांनी फुलली

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने १ जानेवारीच्या पहाटेपासूनच राज्यातील तीर्थक्षेत्रे भाविकांनी फुलली आहेत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदिर, गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे. (Welcome 2025)

(हेही वाचा – नववर्षानिमित्त Raj Thackeray यांचा मनसैनिकांसाठी खास संदेश; म्हणाले, “निवडणुकीत जे घडलं ते…”)

नववर्षाच्या निमित्ताने सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासून हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (dagadusheth halwai ganapati) भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे.

कोल्हापुरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात (mahalakshmi kolhapur) भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शिर्डीत भाविक साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होताना दिसत आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत लाखोंच्या संख्येने भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची लगबग सुरु आहे. (Welcome 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.