नवीन वर्षाचे स्वागत बेस्टच्या खुल्या दुमजली बसमधून…

119

मुंबई ३० व ३१ डिसेंबर रोजी मुंबईकर जनतेच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमामार्फत रात्री उशिरापर्यंत जादा बसगाड्या चालविण्यात येतात. यंदा आठवडाभर आधीच झालेली, पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईतील विविध भागात ३१ डिसेंबर २०२२ रोजी मागील वर्षापेक्षा दुप्पट अर्थात एकूण ५० जादा बसगाडया चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : पोहायचे आहे का? या जलतरण तलावाचे सभासद होण्याची संधी… )

परंतु मुंबईकरांची अत्यंत लाडकी असणारी बेस्टची दुमजली बस आणि गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरलेली बेस्टची खुली दुमजली बस प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०१२ च्या रात्रीपासून १ जानेवारी २०२३ च्या पहाटेपर्यंत चालविण्यात येणार आहे.

त्यामुळे आता नवीन वर्षांचे स्वागत आणि नव्या वर्षाचा सूर्योदय पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना आणि पर्यटकांना बेस्टच्या खुल्या दुमजली बसमधून मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रवासी आणि पर्यटकांनी वा बेस्टसेवेचा लाभ आपल्या कुटुंबियांसोबत घेऊन नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याकडून लाखो प्रवासी, वीज ग्राहक आणि तमाम मुंबईकर जनतेला नवीन वर्षांच्या ‘बेस्ट शुभेच्छा’ही देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.