Mumbai Police : शाब्बास मुंबई पोलिस! आम्हाला तुमचा अभिमान आहे; Virat Kohli कडून पोलिसांचे कौतुक

102
Mumbai Police : शाब्बास मुंबई पोलिस! आम्हाला तुमचा अभिमान आहे; Virat Kohli कडून पोलिसांचे कौतुक

टी-२० विश्वचषक विजेते भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे, खुद्द टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीने ‘एक्स’ (X) या हॅण्डलवर पोस्ट टाकून मुंबई पोलिसांचे कौतुक करून आभार मानले आहे. मुंबई पोलिसांनी कमी कालावधीत केलेले योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाचे सोशल मीडियावर सोशल मीडियावर सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (Mumbai Police)

भारताने २००७ नंतर २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वस्तरातून टीम इंडियाचे कौतुक सुरु आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण मोठ्या सणापेक्षा कमी नाही. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची मुंबईत विजय यात्रा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी या विजय यात्रेत सहभागी होणार होते, या साठी मुंबई पोलिस अगोदर तयारी लागली होती. वाहतूक व्यवस्थेपासून विमानतळ ते नरिमन पॉइंट, मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियम बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Mumbai Police)

मरीन ड्राइव्ह ते नरिमन पॉइंट हा संपूर्ण परिसर गुरूवारी सायंकाळी क्रिकटप्रेमींनी फुलून गेला होता. जवळपास ३ लाखांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे पाच हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही. पोलिसांच्या नियोजनाचे आणि कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असुन टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली याने एक्स या सोशल मीडिया हॅण्डल वर पोस्ट टाकून मुंबई पोलिसांचे आणि पोलिस आयुक्तांचे कौतुक करून आभार मानले. (Mumbai Police)

(हेही वाचा – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक; पिक विमा योजनेविषयी काय म्हणतात Dhananjay Munde)

विराटने टाकलेली पोस्ट

टीम इंडियाच्या विजय परेडमध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल @MumbaiPolice आणि @CPMumbaiPolice चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनापासून आदर आणि मनःपूर्वक आभार. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे.🙏🏼 जय हिंद !🫡🇮🇳-

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवर पोस्ट टाकून आपल्या पोलिस टीमचे कौतुक आहे, “माझ्या सहकारी मित्रांनो, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत झालेल्या विजयी यात्रेमध्ये तुम्ही केलेले व्यवस्थापन आणि कर्तव्यप्रती असलेले समर्पण वाखण्याजोगे आहे. सर्व अधिकाऱ्यांचा मला अतिशय अभिमान वाटतो. तसेच मुंबईकरांचे देखील आयुक्तांनी आभार मानले “मुंबईकरांनो, मनापासून धन्यवाद तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. आपण एकत्र मिळून ही जबाबदारी पार पाडली याबद्दल आपला आभारी आहे. (Mumbai Police)
– मुंबई पोलिस आयुक्त 


संघातील आणखी एक खेळाडू रवींद्र जाडेजानेही मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. ‘मुंबई पोलिसांचे शतश; आभार. तुम्ही काल रात्री अगदी अप्रतिम काम केलंत. तुम्हीच खऱे हीरो आहात,’ असं रवी जाडेजाने म्हटलं आहे.

भारतीय संघाचा मायदेशात परतण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. भारतीय संघाला घेऊन येणारं एअर इंडियाचं विमान इंटरनेटवर ट्रॅक केलं जात होतं. विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. नरिमन पॉइंट ते वानखेडे मैदान या १.८ किमींच्या रस्त्यावर लाखो लोक दुपारपासून जमले होते. तर वानखेडे स्टेडिअमही हाऊसफुल्ल होतं. मुंबईत संघाच्या स्वागतासाठी शहर आणि राज्याबाहेरूनही लोक आले होते.

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.