पश्चिम बंगाल सरकारची Calcutta High Court कडून कानउघाडणी; रुग्णालयावरील हल्ल्यावरून व्यक्त केला संताप

108
पश्चिम बंगाल सरकारची Calcutta High Court कडून कानउघाडणी; रुग्णालयावरील हल्ल्यावरून व्यक्त केला संताप
पश्चिम बंगाल सरकारची Calcutta High Court कडून कानउघाडणी; रुग्णालयावरील हल्ल्यावरून व्यक्त केला संताप

पश्चिम बंगालच्या (West Bengal) कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याची कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी गंभीर दखल घेतली आहे. हा हल्ला म्हणजे शासकीय यंत्रणेचे अपयश असल्याचे सांगत कोर्टाने राज्य सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. (Calcutta High Court)

(हेही वाचा – National Film Awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर; ‘हा’ ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा)

राज्य यंत्रणेचे पूर्ण अपयश

कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणाले की, रुग्णालयात तोडफोडीशी संबंधित ईमेल मिळाल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण हाती घेतले. हे राज्य यंत्रणेचे पूर्ण अपयश असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस फौजफाटा उपस्थित होता. परंतु, त्याचा फारसा उपयोग झालेला दिसून आला नाही. ही दुःखद परिस्थिती असून अशा परिस्थितीत डॉक्टर निर्भीडपणे काम कसे करणार ?, असा प्रश्न न्यायालयाने विचारला.

तसेच राज्य सरकार सीआरपीसीचे कलम 144 कधीही लागू करू शकते, परंतु हॉस्पिटलजवळ इतक्या गोष्टी सुरू असताना किमान संपूर्ण परिसराची नाकेबंदी का केली नाही ? त्यादिवशी रस्त्यावर 7 हजार लोक मॉर्निक-वॉकसाठी आले नव्हते अशा शब्दात न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. (Calcutta High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.