पश्चिम बंगालमधील (West Bengal) मालदा (Malda) जिल्ह्यातील मोथाबारी भागात जातीय तणावाला हिंसक वळण लागले. दि. २७ मार्च रोजी हल्लेखोरांनी मोथाबारी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी हिंदूंच्या दुकानांना आणि घरांनाही लक्ष्य करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप कुमार यादव (Pradeep Kumar Yadav) यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केली आणि दंगलखोरांना हाकलून लावले. (Hindu)
( हेही वाचा : इचलकरंजीत क्रीडा संकुल उभारणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची घोषणा)
या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दि. २४ मार्च रोजी १० वाजण्याच्या सुमारास मोथाबारी क्रॉसिंगवरील (Mothabari Crossing) मशिदीसमोर काहींनी फटाके फोडले. त्यावरून वाद निर्माण झाला आणि मशिदीत फटाके फोडण्याच्या घटनेबाबत बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी धर्मांधांचा मोठा जमाव गोळा झाला होता. येथून जमावाने पोलिस ठाण्याकडे कूच केली. त्यावेळी वाटेत असणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) दुकानांवर आणि घरांवर हल्ला करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी शांतात आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेत, रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (Rapid Action Force) जवानांनाही पाचारण केले. तर प्रशासनाने लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा, असे आवाहन केले आहे.(West Bengal)
हेही वाचा :
Join Our WhatsApp Community