वक्फ सुधारणा कायदा (Waqf Amendment Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे हिंसाचार (Murshidabad Violence) भडकला आहे. केंद्र सरकारकडून देशातील इतर राज्यांतही धार्मिक तणावाची शक्यता पाहता सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारला वक्फ सुधारणा अधिनियम २०२५ च्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कुठल्याही धार्मिक तणावाचा अहवाल मिळाला नाही, असे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – मुंबईहून गोव्यात अवघ्या काही तासांत पोहोचा; मंत्री Nitin Gadkari यांनी दिली आनंदाची बातमी, जाणून घ्या काय म्हणाले ? )
केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) बंगालसह अन्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लक्ष ठेवून आहेत. ज्या ठिकाणी वक्फ कायद्याविरोधात आंदोलन असेल, धार्मिक हिंसाचार वाढवणारी कृत्ये याचा आढावा घेतला जात आहे. आंदोलन जास्त भडकणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारांना देण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची (Central Security Forces) मागणी केल्यास तात्काळ त्यांना ती सुविधा दिली जाईल जेणेकरून हिंसाचार भडकणार नाही, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मुर्शिदाबाद येथे पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांनी तणावग्रस्त भागाचा दौरा केला. कोर्टाच्या निर्देशांनुसार पर्यायी केंद्रीय दल तिथे तैनात करण्यात आले आहे. धार्मिक तणाव रोखण्याचा सुरक्षा दलाचा प्रयत्न आहे. अद्याप कुठलीही नवीन हिंसेची घटना घडली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शनिवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. तणावग्रस्त भागात नियंत्रण मिळवण्यासाठी काही पर्याय तयार ठेवले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Murshidabad Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community