आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीला (Western Expressway) सामोरं जावं लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीजवळ वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ ते ६ दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जारी केली होती. मात्र कमला उशीर झाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
आज (सोमवार, १४ ऑगस्ट) सकाळपासूनच अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Expressway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
(हेही वाचा – IND vs WI T20I : पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा धुव्वा, विंडिजने जिंकली मालिका)
नेमका प्रकार काय?
अंधेरी उड्डाणपुलावर (Western Expressway) असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरु आहे. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्याने पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ ते ६ दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जारी केली होती. मात्र काम उशिरापर्यंत सुरु असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
या वाहतूक कोंडीमध्ये (Western Expressway) अॅम्ब्युलन्स देखील अडकली होती. आज सोमवार असल्याने बोरिवली इथून मुंबईकडे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे.हे काम अजून काही वेळ सुरु राहणार असून लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community