आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच बुधवार, 16 ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Local Train Block) विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. आज अनेक कार्यालयांना पारसी नूतन वर्षाची सुट्टी असली तरीही काही कार्यालयं सुरु आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाच्या अडचणीत काहीशी वाढ झाली आहे.
डहाणू रोड रेल्वे स्थानकात बुधवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक (Western Local Train Block) घेण्यात येत आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांपासून ते 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
(हेही वाचा – Rainfall : राज्याच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मुंबईसह कोकणात रिपरिप)
ब्लॉकमुळे (Western Local Train Block) गाडी क्रमांक 22956 भूज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 30 मिनिटे उशिराने आणि गाडी क्रमांक 22930 वडोदरा-डहाणू रोड एक्स्प्रेस 45 मिनिटे उशिराने धावणार आहे. चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या देखील अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष ब्लॉकचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
सकाळी 7.51 ची अंधेरी-डहाणून रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंतच धावेल.
सकाळी 9.37 ची डहाणू रोड- अंधेरी लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.
सकाळी 7.42 ची चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.
सकाळी 10.10 ची डहाणू रोड- विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.
सकाळी 8.49 चर्चेगट- डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंत धावेल.
सकाळी 11.35 डहाणू रोड ते विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community