पश्चिम रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी, १३ जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास खोळंबली. यामुळे विरारहून सुटणाऱ्या दुपारच्या दोन एसी लोकल रद्द करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वातानुकूलित लोकलचा खोळंबा झाला आहे.
आधीच सध्या मुंबईत तापमानाचा पारा चढला आहे, प्रवासी उकाड्याने हैराण झाले असताना पश्चिम रेल्वे वातानुकूलित लोकल रद्द करत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विरारकडे येणाऱ्या लोकलच उशिरा पोहोचल्या. त्यामुळे पाऊण तास ते एक तास उशिराने लोकल धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे गाड्या उशिराने धावत असल्याची उद्घोषणा करण्यात आल्यानंतर प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.
(हेही वाचा Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तेलाच्या टँकरला आग; चार जणांचा मृत्यू)
दुपारी १.१८ वाजताची लोकल १.४० वाजता नालासोपारा स्थानकावर आली, त्यानंतर अत्यंत संथ गतीने ती पुढे सरकत राहिली. ही लोकल दुपारी २.४४ वाजता कांदिवली स्थानकावर पोहोचली. जलद आणि धीमी दोन्ही मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
Join Our WhatsApp Community