Western Railway: पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

142

गोरेगाव स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

कामावर जाण्याची वेळ असतानाच हा बिघाड झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. फास्ट लोकलदेखील धिम्या गतीने जात असून हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर नेरळ रेल्वेस्थानकावर मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार फार कमी घडतात.

( हेही वाचा: पॅन कार्डमधील आडनाव बदलायचंय? फक्त ‘या’ 3 ऑनलाईन स्टेप्स करा फॉलो )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.