अंधेरीतील गोखले ब्रीजच्या पाडकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व ते पश्चिम या मार्गांना जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल तोडण्याच्या कामास सुरूवात झाली असून १३ तारखेपर्यंत रात्रीच्या वेळी ४ तासांचा मेगाब्लॉक घेऊन या पूलाचे तोडकाम करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
( हेही वाचा : ट्रेनच्या जनरल तिकिटावर करता येईल स्लीपर कोचमधून प्रवास! अतिरिक्त शुल्कही नाही, काय आहे रेल्वेचा नवा नियम)
७ नोव्हेंबर २०२२ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी आता पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. या मेगाब्लॉक दरम्यान रात्री १२.१५ ते ४.४५ दरम्यान हार्बर अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात येणार आहे.
वेळापत्रकात बदल
- विरार ते चर्चगेट रात्री ११.४० आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री १२.४६ ची लोकल गोरेगाव ते अंधेरी दरम्यान जलद मार्गांवरून धावणार आहे.
- अंधेरी ते विरार लोकल पहाटे ४.४० वाजता सुटणार आहे.
पंधरा डबा लोकलच्या आणखी १२ फेऱ्या
पश्चिम रेल्वेने गुरुवार १२ जानेवारीपासून पंधरा डब्यांच्या आणखी १२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ६ फेऱ्या या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community