दसऱ्याच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वेवर (Western Railway) १२ नव्या उपनगरी रेल्वेगाड्या सुरू झाले आहेत. पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या (Local Railway) फेऱ्यांची संख्या १,३९४ वरून १,४०६ इतकी होईल. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले. डहाणू आणि विरार विभागातील प्रवाशांना विस्तारित केलेल्या उपनगरी रेल्वेगाड्यांचा फायदा होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (Western Railway New Time Table)
पश्चिम रेल्वेच्या नव्या वेळापत्रकात काय आहे बदल ?
- बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता सुटणार आहे. ही लोकल भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटून चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहचेल.
- विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही लोकल विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल.
- वसई रोड – चर्चगेट जलद लोकल आता विरारवरून सुटेल. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद एसी लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोहोचेल.
- चर्चगेटहून सकाळी ९.१९ वाजता सुटणारी चर्चगेट – बोरिवली जलद लोकल लोकल विरारपर्यंत विस्तारित केली आहे. ही लोकल सकाळी १०.३९ वाजता विरारला पोहोचेल.
- दुपारी ४.३७ वाजता अंधेरी-विरार जलद लोकल दादरवरून दुपारी ४.४८ वाजता सुटेल. तर ही लोकल विरारला सायंकाळी ५.४४ वाजता पोहचेल.
- चर्चगेटहून सायंकाळी ७ वाजता सुटणारी चर्चगेट-वसई रोड जलद एसी लोकल विरारपर्यंत विस्तारित केली असून ही लोकल विरारला रात्री ८.२२ वाजता पोहचेल. (Western Local Railway New Time Table)
(हेही वाचा – मदरशांना दिला जाणार निधी थांबवा; NCPCR ची उत्तर प्रदेश सरकारला सूचना)
पश्चिम रेल्वे मार्गावरील आताच्या लोकल फेऱ्या –
– १५ डब्यांची लोकल फेऱ्या – २०९
– १२ डब्यांची लोकल फेऱ्या – १,१९७
– एकूण लोकल फेऱ्या – १,४०६ फेऱ्या
– यामध्ये एसी लोकलच्या ७९ फेऱ्यांचा देखील समावेश आहे.
– आधी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या – १,३९४
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community