Western Railway : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाची २०२४-२५ या आर्थिक वर्षात व्यावसायिक कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. सामान्य लोकल, वातानुकूलित लोकल आणि लांबपल्लाच्या रेल्वेगाड्यामधून महसूल चांगला मिळाला आहे. त्याचबरोबर मालवाहतूक, पार्किंग आणि कॅटरिंगमधून आतापर्यंतचा सर्वोत्तम महसूल प्राप्त झाला आहे. (Western Railway)
(हेही वाचा – clay water pot : मातीच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने मिळतात अनेक फायदे! जाणून घ्या काय आहेत ते?)
तसेच पश्चिम रेल्वेने प्रवासी सेवा वाढवण्याबरोबरच उत्पन्न वृद्धीवरही भर दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक व्यावसायिक महसूल मिळवला आहे. मुंबई सेंट्रल विभागाने सुमारे ४,४८५ कोटी रुपये महसूल मिळवला असून वातानुकूलित लोकलमधून (Air-conditioned local train) मिळालेल्या उत्पन्नाचा त्यात समावेश आहे.
मुंबई सेंट्रल विभागाला प्रवासी वाहतूक (उपनगरीय आणि लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्या) महसूल श्रेणीमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ३,७८२ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळला आहे. तर प्रवासी आरक्षण यंत्रणेमधूनही (पीआरएस) आतापर्यंतचा सर्वोत्तम महसूल प्राप्त झाला आहे. तसेच मालवाहतूक श्रेणीत आतापर्यंतचा सर्वाधिक सुमारे २५६ कोटी रुपये महसूल (Railway Revenue) मिळाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेने सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटातून १४ कोटी रुपये, कॅटरिंग स्टॉल्समधून १६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या कामगिरीबद्दल पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
(हेही वाचा – रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांना राज्य सरकारचा ८० कोटींचा निधी: उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे शिक्कामोर्तब)